कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : हुपरी येथील सरकारी गायरानमध्ये अनाधिकृत केलेल्या 844 अ/1 मधील गट क्रमांक 4489 जमीनीवर केलेल्या मदरसाचा बांधकामची अंतिम नोटीस 12 डिसेंबर रोजी देण्यात आली होती. त्यानंतर 28 डिसेंबर पर्यंत त्यांना मदरशा काढून घेण्यासंदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी अजय नरळे यांनी सूचना केल्या होत्या.
परंतु त्यांची कोणतीही हालचाल न दिसल्याने हुपरी नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्तामध्ये आज पहाटे 4 पासून हुपरी येथील सुन्नत जमियतच्या मदरशाचे बांधकाम पाडण्याचे काम हाती घेतले.
सकाळपासून गावांमध्ये पोलीस बंदोबस्त चोक लावून पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवी, प्रांताधिकारी चौगुले, हुपरी पोलीस स्टेशनचे पीआय चौखंडे, इचलकरंजी विभागाचे पोलीस सचिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज हे अनाधिकृत अतिक्रमण पाडण्याचे काम सुरू झाले गावात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावातील व्यापारी यांनी आज आपली दुकाने बंद ठेवली.