कपिलेश्वर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रसह कर्नाटक गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र येथील संतबाळूमामा यांचा 132 वा जन्मोत्सव मंगळवार दि.15 आक्टोबर रोजी सायंकाळी 4.23 वा. साजरा केला जाणार असल्याची माहिती देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी दिली.

काही दिनदर्शिका मध्ये 14 ऑक्टोंबर रोजी संत बाळूमामा जन्मोत्सव अशी नोंद आहे. 13 आक्टोबर रोजी पाशांकुशा स्मार्त एकादशी व 14 ऑक्टोबरला भागवत एकादशी आहे.बाळूमामाचा जन्म काळ हा द्वादशीचा आहे. त्यामुळे आदमापूर येथील बाळूमामा 15 आक्टोबर रोजी संध्याकाळी 4.23 वा. जन्मोत्सव साजरा केला जाणार असल्याने याची भाविक, भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन कार्याध्यक्ष रागिनी खडके यांनी केले आहे. यावेळी सचिव संदीप मगदूम,दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंत पाटील, संभाजी पाटील,दिलीप पाटील, शामराव होडगे सर्व विश्वस्त उपस्थित होते.