मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर नुकताच ईडीने छापा टाकला. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, असे राणे यांनी म्हटले आहे. ते हिंगोली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी नितेश राणे म्हणाले की, प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू आहेच. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे हे सुरु असतानाच याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळेच ते जास्त फडफड करत आहेत. ईडीच्या कारवाईमुळेच संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना ?, अशीही मला शंका असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.