कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले बनवणाऱ्या युवकांसाठी दरवर्षी गड किल्ला स्पर्धाचे आयोजन होते.यावेळी देखील या स्पर्धेचे जोरदार आयोजन केले होते. 52 गडकिल्ले सहभागी झाले होते. प्रत्येक ग्रुपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांची प्रतिकृती साकारली होती.

या स्पर्धेमध्ये प्रथम 10 विजेत्यांना बक्षीस आणि रोख रक्कम देण्यात आली –

प्रथम क्रमांक – राजे संभाजी तरुण मंडळ, शिवाजी पेठ सिहंगड,
द्वितीय – जुना बुधवार तालीम प्रणित फायटर स्पोर्ट्स, रोहिडा
तृतीय क्रमांक – विजेता तरुण मंडळ कसबा बावडा
चौथा क्रमांक – जय हनुमान भक्त मंडळ, जाधव वाडी..
पाचवा – किल्ला बॉईज पाचगाव
सहावा – हिंदवी स्पोर्ट्स क्लब विचारे माळा
उत्तेजनार्थ -MG बॉईज मर्दानी खेळ आखाडा..
उत्तेजनार्थ – शेषनारायन तरुण मंडळ मंगळावर पेठ
उत्कृष्ट सादरीकरण – छत्रपती राजाराम तरुण मंडळ, सिंधुदुर्ग, उजळाईवाडी
मावळा ग्रुप राजूपाध्ये नगर विशेष आकर्षण

याबरोबर सर्वच उपस्थित संघांना शील्ड आणि प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे आयोजन युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित किरण माने यांनी केले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ येथे पार पडला. कार्यक्रमादरम्यान प्रमुख मान्यवर शिवसेना उपनेते संजय पवार, युवा सेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे,सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मुलांना मार्गदर्शन केले. याबरोबर सर्व मुलांना निरव्यसनी होण्याची शपथ देऊन क्रीडा अधिकारी पदी निवड झालेल्या स्नेहल चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे,महिला आघाडी उपतालुका प्रमुख अनिता ठोंबरे, राजू सांगावकर, युवासेनेचे चैतन्य देशपांडे, अक्षय घाटगे, किर्तीकुमार जाधव, रोहित वेढे, प्रथमेश देशिंगे, लाटीफ शेख, संकेत गुरव, युवती सेनेच्या राजर्षी मिणचेकर, सानिका दामूगडे,अभिषेक दाबाडे सुमित मेळवंकी आदी उपस्थित होते.