मुंबई : टेक महिंद्रा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे.ह्या कंपनीचे 90 देशांमध्ये 1,25,236 कर्मचारी आहेत.ही कंपनी 47 व्या क्रमांकावर आहे.टेक महिंद्राने महिंद्रा सत्यममध्ये विलीनीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली आहे.आयटी क्षेत्रातील देशातील आघाडीवर असलेली कंपनी टेक महिंद्राने आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीचे म्हणजेच सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
सप्टेंबर तिमाहीत टेक महिंद्रा कंपनीचा एकुण नफा वार्षिक आधारावर 153.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर 1250 कोटी रुपये इतका झाला आहे.तर कंपनीचा एकुण नफा तिमाही-दर-तिमाही आधारावर 46.81 टक्क्यांनी वाढला गेला आहे.तर कंपनीने 1 नोव्हेंबर ही शेवट लाभांशाची रेकॉर्ड तारीख निश्चित केली गेली आहे.येवढेच नाही तर कंपनीने सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याबरोबरच टेक महिंद्रा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 15 अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.