मुंबई ( प्रतिनिधी ) : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा उत्साह हळूहळू शिगेला पोहोचत आहे. ॲडलेड कसोटी हरल्यानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलच्या टॉप-2 मधून टीम इंडिया बाहेर गेली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला पुन्हा एकदा टॉप-2 मध्ये स्थान मिळू शकते.
सध्याच्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 60.71 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 59.26 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धची दुसरी कसोटी गमावली तर त्यांच्या टक्केवारी 53.33 होईल. अशा स्थितीत टीम इंडियाला पुन्हा टॉप-2 मध्ये स्थान मिळेल. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर जाईल. या विजयाचा फायदा श्रीलंकेला होणार असून ऑस्ट्रेलिया आणि भारतानंतर संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेच्या खात्यात 54.54 टक्के गुण जमा होतील. टीम इंडियाने मालिकेत आणखी एक सामना गमावला तर त्याच्या अडचणी वाढतील. पण श्रीलंका आणि पाकिस्तानी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर भारतीय संघ फायनल खेळू शकतो.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आता तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा पराभव करायचा आहे. दोन सामने संपल्यानंतर दोन्ही संघांमधील पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.