कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपल्या किचनमध्ये असणारा पदार्थ म्हणजे दूध आणि खजूर.तर आरोग्यासाठी खूप चांगला असणारे हे पदार्थ रात्री दुधासोबत खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.खजुराचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.हिवाळ्यात हे पिण्याचे बरेच मोठे फायदे दिसून येतात.खजुरासोबत दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.दोन्हीमध्ये भरपूर पोषक घटक असतात.रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात 2-3 खजूर मिक्स करून पिणे सर्वात चांगले असते.

दुध आणि खजूर एकत्र घेतल्याने होणारे फायदे :

शरीरात ऊर्जा वाढते : दुध आणि खजूरमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक साखर असते.ही ऊर्जा देणारे पदार्थ आहेत आणि आपल्याला दिवसभर ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात.

पाचन शक्ती सुधारते : खजूरमध्ये भरपूर फायबर असते जे पचनक्रिया सुधारते आणि कब्ज आणि अपचन यासारख्या समस्या टाळण्यास मदत करते.

हाडाची ताकद वाढते : दुधात कॅल्शियम भरपूर असते जे हाडाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.खजूरमध्येही काही प्रमाणात कॅल्शियम असते.त्यामुळे दुध आणि खजूर एकत्र घेतल्याने हाडांची घनता वाढते आणि हाडे मजबूत होतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते : खजूरमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

रक्तदाब नियंत्रण राहतो : खजूरमध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

वजन वाढण्यास मदत : दुध आणि खजूर हे दोन्ही वजन वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.त्यामुळे वजन कमी असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर : खजूरमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.