कळे ( प्रतिनिधी ) – महावितरणच्या वतीने घरगुती, औद्योगिक व कृषी वीज ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळे उपविभागीय महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता डी.एम.कमतगी यांनी केले.
विद्युत निरीक्षण कार्यालय कोल्हापूर व महावितरण कळे उपविभाग यांच्यावतीने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहनिमित्त कळे येथील कुमार-कन्या विद्यामंदिर शाळेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.प्रमुख पाहुण्या म्हणून विद्युत निरीक्षण कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता निलम पाटील उपस्थित होत्या.
यावेळी निलम पाटील यांनी विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश सांगून महावितरणच्या विविध योजनांची माहिती दिली.
याप्रसंगी आर.ए.साजणे, सर्व शाखा अभियंता, अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.