मी फक्त शिकायला गेलतो ; भाजपच्या माजी आमदाराची ठाकरे सेनेत वापसी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप व्हायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर विरोधी पक्षातील अनेक नेते हे मविआ सोबत असणाऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. आज भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केली आहे. कुथे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.आज शुक्रवारी (ता. 26 जुलै)… Continue reading मी फक्त शिकायला गेलतो ; भाजपच्या माजी आमदाराची ठाकरे सेनेत वापसी

जोरदार शक्तिप्रदर्शनाने वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश

मुंबई : वसंत मोरे यांनी मनसेनंतर आता वंचितलाही रामराम करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज हाती शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे त्यांच्यासह पुण्यातील मनसेचे तब्बल 23 नेते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मनसेत झालेल्या अंतर्गत मतभेदांनंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केला. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून… Continue reading जोरदार शक्तिप्रदर्शनाने वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश

वसंत मोरे आता ठाकरे सेनेत, लोकसभेनंतर ‘वंचित’ला ‘जय महाराष्ट्र’ ; कार्यकर्ते आक्रमक

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसेला जय महाराष्ट्र करुन वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत पुणे लोकसभा लढवलेले वसंत मोरे आता पुन्हा चर्चेत आले आहेत. वसंत मोरे यांनी वंचितची साथ सोडत उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत हातात शिवबंधन बांधलं आहे. तर मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मेसेज करून माफी मागितली असल्याचं… Continue reading वसंत मोरे आता ठाकरे सेनेत, लोकसभेनंतर ‘वंचित’ला ‘जय महाराष्ट्र’ ; कार्यकर्ते आक्रमक

दानवेंची शिवीगाळ ; महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींची पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो : उद्धव ठाकरे

मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी (1 जुलै) राज्याच्या विधान परिषद सभागृहात उमटल्याचे पाहायला मिळाले. आमदार प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात सुमोटो प्रस्ताव मांडला तर प्रसाद लाड हेही आक्रमक झाले होते. यावेळी बोलायला उभे राहिलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रसाद लाड यांनी हात दाखवला. यावरून ते… Continue reading दानवेंची शिवीगाळ ; महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींची पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो : उद्धव ठाकरे

स्वाती मालीवालांचे इंडिया आघाडीच्या नेत्यांना पत्र; चर्चेसाठी उद्धव ठाकरेंची मागितली वेळ

दिल्ली : स्वाती मालीवाल यांनी आपल्यावरील कथित हल्ल्याबाबत नवीन मोहीम सुरू केली आहे. त्यांनी आपल्या पक्षाला ‘इंडिया’ आघाडीत घेरण्याचे काम सुरू केले आहे. मालीवाल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना पत्रे लिहिली आहेत. मालीवाल यांनी या पत्रात त्यांच्या वेदना सांगितल्या असून त्यांनी या नेत्यांना भेटण्यासाठी… Continue reading स्वाती मालीवालांचे इंडिया आघाडीच्या नेत्यांना पत्र; चर्चेसाठी उद्धव ठाकरेंची मागितली वेळ

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंशी संपर्क केला पण… : नाना पटोले

मुंबई : विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत… Continue reading विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंशी संपर्क केला पण… : नाना पटोले

विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी ? ; काँग्रेस नेते ठाकरेंवर नाराज

मुंबई : लोकसभा निवडणुका संपताचं महाविकास आघाडीत आता विधापरिषदेतील जागावाटपावरून जुंपली आहे. ठाकरे गटाकडून परस्पर 4 जागा जाहीर केल्यामुळे नाना पटोलेंनी आज पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त करत अजूनही वेळ गेली नसल्याचं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा परस्पर उमेदवार घोषित केल्यामुळे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला संतप्त झाले आहेत.राज्यात विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक… Continue reading विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी ? ; काँग्रेस नेते ठाकरेंवर नाराज

विधान परिषद निवडणूक : उद्धव ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर

मुंबई : विधान परिषद निवडणूक शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत पुढे ढकलण्यात आली होती. या चार मतदारसंघांतील निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. यात दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश असून, दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करत ठाकरेंनी निवडणुकीत आघाडी घेतली आहे. शिवसेनेने अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी दिली… Continue reading विधान परिषद निवडणूक : उद्धव ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर

error: Content is protected !!