Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
news Archives -

बेलवळे बुद्रुक अपघातातील मृत होमगार्डच्या कुटुंबीयांना दोन लाखाचा विमा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान….

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : बेलवळे बुद्रुक ता कागल येथील होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत आप्पासो पाटील वय ४१ यांचे एक महिन्यापूर्वी मयत झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेअंतर्गत जीवन ज्योती विम्यातून दोन लाख रुपयांचा भरपाई रक्कम मंजूर झाली. त्यांच्या पत्नी संध्या चंद्रकांत पाटील यांना दोन लाख रुपयांचा धनादेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन… Continue reading बेलवळे बुद्रुक अपघातातील मृत होमगार्डच्या कुटुंबीयांना दोन लाखाचा विमा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान….

केडीसीसी बँकेकडून बेलवळे बुद्रुकमध्ये लाडक्या बहिणींना अर्थसाह्य वितरण

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने लाडक्या बहिणींसाठी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या माता-भगिनींसाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत उद्योग व व्यवसायासाठी महिलांना ३० हजार रुपये अर्थसाह्य मिळणार आहे. मासिक ९६३ रुपयांच्या अत्यल्प हप्त्यावर बँकेने ही सुविधा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत बेलवळे बुद्रुक… Continue reading केडीसीसी बँकेकडून बेलवळे बुद्रुकमध्ये लाडक्या बहिणींना अर्थसाह्य वितरण

हिंदीची सक्ती करून मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव, हिंदी भाषेची सक्ती रद्द करा: हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई : मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे… Continue reading हिंदीची सक्ती करून मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव, हिंदी भाषेची सक्ती रद्द करा: हर्षवर्धन सपकाळ.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी रोजगार मेळावा

कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यात पीएम नॅशनल अप्रेंटीस मेला (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. मेळाव्यास जिल्ह्यातील नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी पूर्ण… Continue reading शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी रोजगार मेळावा

अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या क्रीडास्पर्धा

कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४६ व्या क्रीडा स्पर्धा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात दि. १७ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ऍथलेटिक्स, कॅरम व व्हॉलीबॉल स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धा महापारेषण, महानिर्मिती, महावितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होत आहेत. देशभरातून सुमारे एक हजार महिला व पुरुष… Continue reading अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या क्रीडास्पर्धा

गुड फ्रायडे म्हणजे नक्की काय..?

ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे दे दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात आणि येशूचं स्मरण करतात आणि मोठ्या उत्साहाने सामाजिक कार्य करतात. गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर चढवून त्याला मारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस… Continue reading गुड फ्रायडे म्हणजे नक्की काय..?

वाचनसंस्कृतीच्या विकासाठी शंभर वर्षापूर्वी शाहू राजांनी ग्रंथदान उपक्रम राबवला -डाॅ.जे .के. पवार

गारगोटी :- (प्रतिनिधी) : ” वाचन प्रोत्साहनासाठी वाचनसंस्कृती रुजली पाहिजे, हे शंभर वर्षापूर्वीच ओळखून शाळाशाळांतून प्रत्यक्षात ग्रंथभेट देवून कृतिशील विचार शाहूमहाराजांनी समाजाला दिला. तोच वारसा साहित्यिक जीवन साळोखे राबवत आहेत.ग्रंथदानातून वाचनसंस्कृती आणि समृद्ध शालेय ग्रंथालय अभियान अधिक गतिमान होणार आहे.” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, संशोधक प्राचार्य डाॅ.जे.के.पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेतील अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत,येथील… Continue reading वाचनसंस्कृतीच्या विकासाठी शंभर वर्षापूर्वी शाहू राजांनी ग्रंथदान उपक्रम राबवला -डाॅ.जे .के. पवार

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून “टेक्नोत्सव २के२५”

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे 24 व 25 एप्रिल रोजी “टेक्नोत्सव २के२५” या अभियांत्रिकीच्या तांत्रिक कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अभियांत्रिकीच्या सर्व वर्षांच्या सर्व विद्याशाखांसाठी असून कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते या स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण झाले. याबाबत अधिक माहिती… Continue reading डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून “टेक्नोत्सव २के२५”

कोरे अभियांत्रिकीत २२ एप्रिलला युरेका -जिज्ञासा स्पर्धा आयोजित

वारणानगर ( प्रतिनिधी ) : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय गेली ३८ वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक, विभागप्रमुख… Continue reading कोरे अभियांत्रिकीत २२ एप्रिलला युरेका -जिज्ञासा स्पर्धा आयोजित

राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सुभाष नारकर जिल्ह्यात प्रथम

कळे ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत प्राथमिक विभागामध्ये विद्या मंदिर पोहाळवाडी शाळेचे पदवीधर अध्यापक व जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सुभाष नारकर यांचा तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आला.रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण… Continue reading राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सुभाष नारकर जिल्ह्यात प्रथम

error: Content is protected !!