अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश : अन्नपूर्णा देवी

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : अत्याचारग्रस्त महिलांना येणाऱ्या अडचणी दरम्यान आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आपत्कालीन प्रतिसाद, वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर मदत, समुपदेशन आणि तात्पुरता निवारा अशा सर्व बाबी एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना केली आहे. संकटात असलेल्या महिलांच्या गरजा पूर्ण करणे तसेच अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या… Continue reading अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश : अन्नपूर्णा देवी

महाराष्ट्रात मंदिरांच्या जमिनी बळकावण्याचे अनेक प्रकार उघड..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, धार्मिक उत्सव यांसाठी राजे महाराजे यांच्यासह भाविक-भक्त यांनी देवस्थानांना शेतजमिनी दान दिल्या होत्या, तसेच तत्कालीन मंदिर व्यवस्थापनानेही काही जमिनी खरेदी केल्या होत्या. या शेत जमिनीपैकी इमान असलेल्या शेत जमिनीची भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग -2 असल्याने त्या जमिनीचे कोणतेही बेकायदेशीररित्या हस्तांतरण करता येत नाही. असे असतांना शेत जमिनीच्या… Continue reading महाराष्ट्रात मंदिरांच्या जमिनी बळकावण्याचे अनेक प्रकार उघड..!

महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा : अजित पवार

शिर्डी : जानेवारी – महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन करताना… Continue reading महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा : अजित पवार

पेंढारवाडीत आग ; अडीच लाखाचे नुकसान

आजरा (प्रतिनिधी ): आजऱ्यातील पेंढारवाडी येथे शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीत उभे गवत, गवत गंजी,2 एकर क्षेत्रातील ऊस,अर्धा एकर क्षेत्रातील तुर, आंब्याची 20 झाडे जळून खाक झाली. रमेश लोखंडे, प्रभाकर आजगेकर, धोंडीबा लोखंडे, मारुती लोखंडे आदिंचे यामध्ये नुकसान झाले. तलाठी अजीत बेळवेकर, पोलीस पाटील सुभाष आजगेकर, कोतवाल शिवाजी चव्हाण यांनी… Continue reading पेंढारवाडीत आग ; अडीच लाखाचे नुकसान

आजऱ्यात धाडसी निकितावर कौतुकांचा वर्षाव

आजरा (प्रतिनिधी ) गुरुवारी आजरा बस स्थानकात प्रवासी महिलेची पर्स चोरून पलायन करणाऱ्या दोघा महिलांना प्रसंगावधान राखत धाडसाने पाठलाग करून स्थानिक तरुणांच्या मदतीने पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याप्रकरणी वेळवट्टी ता. आजरा येथील निकिता देसाई या तरुणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्रसिंह सावंत, विजय थोरवत, दयानंद नेऊंगरे, इंद्रजीत देसाई यांच्या… Continue reading आजऱ्यात धाडसी निकितावर कौतुकांचा वर्षाव

मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?: नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत अशा… Continue reading मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?: नाना पटोले

संसाधन व्यक्तींची नामिका सूची तयार करण्यासाठी अर्ज सादर करा : जालिंदर पांगरे

कोल्हापूर, (प्रतिनिधी ) : केंद्र शासन सहाय्यक प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिका सूची तयार करावयाची आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून दिनांक 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. जिल्हा… Continue reading संसाधन व्यक्तींची नामिका सूची तयार करण्यासाठी अर्ज सादर करा : जालिंदर पांगरे

आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येत्या वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होईल : अच्युत गोडबोले

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येत्या 5 ते 10 वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होणार आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील नोकर्‍या काही प्रमाणात कमी होतील, हे खरे असले तरी ज्यांना नाविन्यपूर्ण गोष्टी शिकण्याची आवड आहे. बदलत्या तंत्रज्ञानाला आत्मसात करून रोजगाराच्या नवनवीन वाटा शोधण्याचे कौशल्य ज्या व्यक्तींकडे आहे, त्यांना काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कॉम्प्युटर… Continue reading आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येत्या वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होईल : अच्युत गोडबोले

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा उद्या जिल्हा दौरा आहे. रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी. सायंकाळी 7 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सोमवार दिनांक दि. 20 जानेवारी 2025… Continue reading वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा उद्या जिल्हा दौरा

कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी 7.10 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर येथून शासकीय मोटारीने गारगोटी, ता. भुदरगड येथील निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी… Continue reading सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा उद्या जिल्हा दौरा

error: Content is protected !!