रिलायन्स फाउंडेशनने 5 हजार अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्तींची यादी केली जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रिलायन्स फाउंडेशनने अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देशभरातून 5 हजार विद्यार्थ्यांची निवड केली आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी धीरूभाई अंबानी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त जाहीर करण्यात आली. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी 1 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 70 %… Continue reading रिलायन्स फाउंडेशनने 5 हजार अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्तींची यादी केली जाहीर

‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण.. : अरुण डोंगळे

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत 2025 या नवीन वर्षाच्या गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक माहिती तसेच गोकुळ सौर… Continue reading ‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण.. : अरुण डोंगळे

ना. मुश्रीफ – ना. आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट..!

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ यांनी नवव्यांदा तर नामदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी नंतर आज हे दोन्ही मंत्री प्रथमच कोल्हापुरात आले. त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी डोंगळे… Continue reading ना. मुश्रीफ – ना. आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट..!

बाबासाहेबांचा खरा सन्मान भारतीय जनता पक्षाने..; आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या फेक नॅरेटिव्ह विरोधात सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळ सभागृहाच्या दारात निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये आमदार अमल महाडिक सहभागी झाले होते. सातत्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाने चालवलेल्या कोल्हेकुई विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आ. अमल महाडिक यांनी प्रतिपादन केले. आ. अमल महाडिक काय म्हणाले..? आ. महाडिक म्हणाले, बाबासाहेबांचा… Continue reading बाबासाहेबांचा खरा सन्मान भारतीय जनता पक्षाने..; आ. अमल महाडिक

कोरगांवकर हायस्कूलच्या क्रीडास्पर्धेची दिमाखदार सांगता..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांची दिमाखदार सांगता झाली . स्पर्धेमध्ये सांघिक, वैयक्तिक आणि अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारातील सर्व खेळांचा समावेश केला गेला होता. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव एम .एस . पाटोळे यांच्या हस्ते झाले. शाळेचे माजी विद्यार्थी डॉॅ. शब्बीर हजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.… Continue reading कोरगांवकर हायस्कूलच्या क्रीडास्पर्धेची दिमाखदार सांगता..!

हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन यात्रा आवश्यक : प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतात लाखो मंदिरे आहेत आणि त्यांचे वेगवेगळे भक्त आहेत. आपण जरी वेगवेगळे असलो, तरी जेव्हा देवासमोर येतो तेव्हा आपण आपल्यातील वेगळेपण विसरून एकत्र येतो. त्याचप्रकारे हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक आहे, असे प्रतिपादन प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी केले. श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. व्यासपिठावर प.पू. दादा… Continue reading हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन यात्रा आवश्यक : प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामी

अल्लू अर्जुनची तुरूंगातून सुटका ; हात जोडून म्हणाला…

मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिणसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला काल अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या संध्या थिएटर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केली होती. हैदराबादेत झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली होती. अटकेमुळे अल्लू अर्जुनला रात्र… Continue reading अल्लू अर्जुनची तुरूंगातून सुटका ; हात जोडून म्हणाला…

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खा. धनंजय महाडिकांनी कोल्हापुरच्या रेल्वे प्रश्नांकडे वेधले लक्ष

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यातून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरशी निगडित रेल्वे प्रश्नांबद्दल नामदार वैष्णव यांच्याशी चर्चा केली. सध्या कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या, गांधीनगर म्हणजेच वलिवडे स्थानकावर थांबत नाहीत. गांधीनगर मधील स्थानिक रहिवासी… Continue reading केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खा. धनंजय महाडिकांनी कोल्हापुरच्या रेल्वे प्रश्नांकडे वेधले लक्ष

शाहरूख खान ‘मन्नत’ बंगल्याचे वाढवणार आणखीन 2 मजले ; ‘इतका’ येणार खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : शाहरूख खान आणि गौरी खानचा मन्नत बंगला सध्या जोरदार चर्चेत आला आहे. शाहरूख खानला त्याच्या मन्नत बंगला आणखीनच आलीशान आणि सुंदर बनवायचा असल्याची माहिती समोर येत आहे. शाहरूख खानची पत्नी गौरी खान हिने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे गेल्या महिन्यातच एक अर्ज दिला होता. ज्यामध्ये मन्नत बंगल्याचे आणखी काही मजले वाढवण्याची परवानगी… Continue reading शाहरूख खान ‘मन्नत’ बंगल्याचे वाढवणार आणखीन 2 मजले ; ‘इतका’ येणार खर्च

कोल्हापुरातील महिलांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात : रुपाली चाकणकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार 20 डिसेंबर रोजी तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोल्हापूर येथे सकाळी 11 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणा-या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या… Continue reading कोल्हापुरातील महिलांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात : रुपाली चाकणकर

error: Content is protected !!