सुधा चौगुले यांची शिवसेना महिला उपतालुका प्रमुख तर पुनम खाडे यांची महिला विभाग प्रमुख पदी निवड

टोप ( प्रतिनिधी ) : हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचे संमतीने लोकप्रिय खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी वैशाली डोंगरे यांचे हस्ते महिला आघाडी आघाडीची… Continue reading सुधा चौगुले यांची शिवसेना महिला उपतालुका प्रमुख तर पुनम खाडे यांची महिला विभाग प्रमुख पदी निवड

कोल्हापूरच्या समर्थ पाटीलची दिल्ली परेडसाठी निवड 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या परेडसाठी कोल्हापुरच्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. महावीर महाविद्यालयातील 1 महाराष्ट्र बॅटरी  एनसीसी युनिट मधील छात्र कॅडेट समर्थ कृष्णात पाटील यांची 26 जानेवारी रोजी कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड आणि पंतप्रधान रॅलीसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर या ठिकाणी चार शिबिरे आणि पुणे… Continue reading कोल्हापूरच्या समर्थ पाटीलची दिल्ली परेडसाठी निवड 

जिल्ह्यात नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग’ ची प्रभावी अंमलबजावणी होणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरातील शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेती करण्यास आणि नैसर्गिक शेतीचा आवाका वाढविण्यास उपयुक्त असलेल्या केंद्र शासनाच्या ‘नॅशनल, मिशन ऑन नॅचरल फार्मिंग’ योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 40 गटांचे लक्षांक असून 2 हजार हेक्टर क्षेत्रावर या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. याकरिता 5 कोटी 99 लाख रुपयांच्या वार्षिक कृती… Continue reading जिल्ह्यात नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग’ ची प्रभावी अंमलबजावणी होणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे

खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांवर दुय्यम खत खरेदीचे बंधन करु नये : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : खत विक्रेत्यांनी खताची विक्री करताना शेतकऱ्यांवर दुय्यम खत खरेदीचे बंधन करु नये तसेच खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी… Continue reading खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांवर दुय्यम खत खरेदीचे बंधन करु नये : जिल्हाधिकारी अमोल येडगे

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या  रणवीर काटकर आणि अथर्व पाटील हे पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करतील.  ओंकार चोपडे याची भोपाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मलखांब स्पर्धेसाठी, सौरीष साळुंखे याची… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

‘छावा’ चित्रपटातील रश्मिकाचा लुक समोर..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल कसा दिसेल, याची झलक काही फोटोंमधून नुकतीच पाहायला मिळाली. या चित्रपटात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत होती. आता अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतील लुक देखील समोर… Continue reading ‘छावा’ चित्रपटातील रश्मिकाचा लुक समोर..!

सी.पी.आर मधील नोकरीसाठी कोणत्याही अमिषाला बळी पडू नका : डॉ. एस.एस. मोरे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सी. पी. आर. प्रशासनामार्फत सध्या वर्ग-४ ची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरतीप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून नागरिकांनी कोणत्याही आमिषाला आणि भूलथापांना बळी पडू नये. या भरतीप्रक्रियेसंदर्भात कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास सी.पी.आर. प्रशासनाशी ०२३१-२६४१५८३ अथवा ९०७५७४०९९६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केले… Continue reading सी.पी.आर मधील नोकरीसाठी कोणत्याही अमिषाला बळी पडू नका : डॉ. एस.एस. मोरे

दुःखद बातमी ! मराठी अभिनेता योगेश महाजन यांचं आकस्मिक निधन…

मुंबई ( प्रतिनिधी ) : योगेश महाजन यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकेतून काम केलं आहे. हॉटेलच्या रूममध्ये ते मृतावस्थेत आढळल्याने अनेकांना धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने योगेश महाजन यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी हिंदी मालिकेचे शूटिंग चालू असताना त्यांना अस्वस्थ जाणवू लागले होते. डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर ते हॉटेलच्या रुमममध्येच थांबले. पण आज… Continue reading दुःखद बातमी ! मराठी अभिनेता योगेश महाजन यांचं आकस्मिक निधन…

वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करा : शिक्षक महासंघाची मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी निवड आणि वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्यावतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई यांना देण्यात… Continue reading वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करा : शिक्षक महासंघाची मागणी

मरळी येथील रक्तदान शिबीरास प्रतिसाद ; 52 रक्तदातांनी केले रक्तदान

कळे ( प्रतिनिधी ) : मरळी येथे श्री. समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने कै. आर. व्ही.अष्टेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात परिसरातील 52 रक्तदातांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन सरपंच कमल चौगले यांचे हस्ते झाले. रक्त संकलन कोल्हापूर येथील वैभवलक्ष्मी ब्लड बँकेने केले. यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि श्री. समर्थ संस्थेकडून भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात… Continue reading मरळी येथील रक्तदान शिबीरास प्रतिसाद ; 52 रक्तदातांनी केले रक्तदान

error: Content is protected !!