शहरात भगवा झंजावात निर्माण करू : आमदार राजेश क्षीरसागर  

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शिवसेना नावात शक्ती आहे. कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे न संपणारी आहे. शिवसेनाप्रमुखांची जयंती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने… Continue reading शहरात भगवा झंजावात निर्माण करू : आमदार राजेश क्षीरसागर  

पन्हाळा येथील अंगणवाडीत सीसीटिव्ही कॅमेरे बसवा : भाजपची निवेदनाद्वारे मागणी

पन्हाळा ( प्रतिनिधी ) : बदलापूर आणि पुण्याच्या राजगुरूनगर येथे अल्पवयीमुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. या घटनेची दखल घेत शासनाने सर्व शाळांमध्ये सुरक्षा म्हणून सीसीटिव्ही बसवण्याचे आदेश दिले आहेत. पन्हाळा भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखालील पन्हाळ्यातील जागरूक नागरिकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांना निवेदनाद्वारे पन्हाळा येथील अंगणवाडी मध्ये बेबी टॉयलेट, पाण्याची सुविधा तसेच… Continue reading पन्हाळा येथील अंगणवाडीत सीसीटिव्ही कॅमेरे बसवा : भाजपची निवेदनाद्वारे मागणी

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी – मार्टमध्ये निवड

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे डी मार्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये 13 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.  24 आणि 25 जानेवारी रोजी हा कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह झाला. डी मार्ट हा भारतातील एक अग्रगण्य किराणा ब्रँड असून देशभरात विविध स्टोअर्स आहेत.  डी मार्ट रेस्ट… Continue reading डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी – मार्टमध्ये निवड

जिल्हा नियोजन समितीची सभा 2 फेब्रुवारी रोजी होणार…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : जिल्हा नियोजन समितीची सभा रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीस नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ उपस्थिती राहणार आहेत,… Continue reading जिल्हा नियोजन समितीची सभा 2 फेब्रुवारी रोजी होणार…

फडणवीसांनी वकिली करण्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाला न्याय देण्याचे काम करावे: नाना पटोले

मुंबई ( प्रतिनिधी ) : सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु असून दररोज एका मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. हिवाळी अधिवेशनात बीड आणि परभणीतील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिले त्यातूनच चित्र स्पष्ट झाले. एखादा निष्णात वकील जसा आरोपीला वाचवण्याचे काम करतो तेच काम मुख्यमंत्री यांनी केले. फडणविसांनी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून भाषण केले नाही. देवेंद्र… Continue reading फडणवीसांनी वकिली करण्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाला न्याय देण्याचे काम करावे: नाना पटोले

टोप येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अन् अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

टोप ( प्रतिनिधी )  : टोप वारकरी संप्रदाय आणि टोप ग्रामस्थ यांच्यावतीने संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री कल्लेश्वर मंदिर टोप येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहचे 1 ते 3 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे विद्यावंशज स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी सद्गुरु ह.भ.प. तात्यासाहेब वासकर… Continue reading टोप येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अन् अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने तत्कालीन मार्गदर्शक कॉ.गोविंदभाई पानसरे यांच्या नावाने दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रबोधन पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार शाहूनगरी कोल्हापूरचे लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. दि. 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती  शब्दगंधचे  अध्यक्ष राजेंद्र उदागे,… Continue reading कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर

‘योगमित्रने’ जपली सामाजिक बांधिलकी..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर मधील योगमित्र या ग्रुपचा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दि. 26 जानेवारी रोजी योगमित्राच्या सदस्यांनी उमेद फाउंडेशनच्या कोपार्डे  ता. करवीर येथील मायेच्या घरास भेट देऊन आपला पहिला वर्धापन दिन मुलांसोबत साजरा केला. यावेळी मुलांना योगाच्या विविध आसनांची माहिती दिली. त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक संवर्धन होईल याविषयी काही आसणे आणि श्वसन… Continue reading ‘योगमित्रने’ जपली सामाजिक बांधिलकी..!

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : भारतीय लोकशाही ही एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे ती आणखीन मजबूत व्हावी, मतदारांनी मतदानाबाबत अधिक जागृत व्हावे व लोकशाही आणखीन बळकट करावी या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने 25 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने… Continue reading राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न…

श्री कामधेनू दूध संस्था 38 लाख अपहार केलेला फरार सचिव रमेश लोंढे पोलिसांना शरण

टोप ( प्रतिनिधी ) : हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेत 38 लाखांचा अपहार प्रकरणी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सचिव आणि प्रमाणित लेखा परीक्षक यांना शिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात वडगांव न्यायालयाने त्यांना सशर्थ गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. अपहार केलेला फरार सचिव रमेश लोंढे याने पोलिसांसमोर हजर झाला.… Continue reading श्री कामधेनू दूध संस्था 38 लाख अपहार केलेला फरार सचिव रमेश लोंढे पोलिसांना शरण

error: Content is protected !!