इचलकरंजीच्या पुरवठा कार्यालयातील प्रलंबित कामांसाठी आ. राहुल आवाडेंनी घेतली अधिकाऱ्यांची भेट ..!

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीच्या पुरवठा कार्यालयातील कामातील अनागोंदी, चालढकलपणा आणि प्रलंबित कामांवर सकाळी अचानक भेट देत अधिकाऱ्यांची आज आमदार राहुल आवाडे यांनी भेट घेतली. येत्या चार दिवसांत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा इशारा देत त्यांनी सोमवारी पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. आ. राहुल आवाडे काय म्हणाले..? आ. राहुल आवाडे म्हणाले, नागरिकांच्या रेशनकार्डसंदर्भातील तक्रारी, बारा… Continue reading इचलकरंजीच्या पुरवठा कार्यालयातील प्रलंबित कामांसाठी आ. राहुल आवाडेंनी घेतली अधिकाऱ्यांची भेट ..!

इंद्रायणी नदीची अवस्था पुन्हा एकदा जैसे थेच..!

पंढरपूर – वारकरी सांप्रदायाची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली असल्याचं पहायला मिळतय. गेल्या आठवड्याभरापासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागलय. आज देखील इंद्रायणी नदीत पांढरे शुभ्र मोठ- मोठे बर्फासारखे तुकडे पाण्यावर तरंगत आहेत. गेल्या कित्येक महिन्यापासून आळंदीकर आणि वारकऱ्यांकडून इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याबाबत आवाहन केलं जात आहे. इंद्रायणी नदीकाठी असणाऱ्या काही कारखान्यांतील रसायनयुक्त पाणी थेट… Continue reading इंद्रायणी नदीची अवस्था पुन्हा एकदा जैसे थेच..!

महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान..; रुपाली चाकणकर

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केलेल्या तक्रारीच्या अर्जावर कारवाईला सुरूवात झाली आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात कारवाईचे पहिले पाऊल उचलत मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतीत राज्य महिला आयोगाकडून माहिती देण्यात… Continue reading महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान..; रुपाली चाकणकर

जिल्ह्यातील मच्छिमारांनी प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृद्धी सहयोजनेसाठी नोंदणी करावी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व मच्छीमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यपालक, मत्स्यसंवर्धक, अनुदानीत, विनाअनुदानीत लाभार्थी, प्रकल्पधारक मत्स्यविक्रेते, मत्स्यखाद्य उत्पादक आणि संबंधित सर्व भागधारकांसाठी प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृद्धी सहयोजना (PMMKSSY) ही प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत केंद्रीय क्षेत्र सहयोजना असून सन 2023- 24 ते सन 2026 – 27 या 4 वर्षांकरिता केंद्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रथम टप्प्यात मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील निगडीत… Continue reading जिल्ह्यातील मच्छिमारांनी प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृद्धी सहयोजनेसाठी नोंदणी करावी

सिद्धार्थ जाधवने केली भावनिक पोस्ट, काय आहे कारण..?

मुंबई (प्रतिनिधी) : स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊदे धिंगाणा हा कार्यक्रम अभिनेता सिद्धार्थ जाधव होस्ट करतोय. आज या कार्यक्रमाचं 100 भाग पूर्ण झाले असून अभिनेता सिद्धार्थ जाधव भावुक झालाय. अभिनेता सिद्धार्थ जाधव यानं याबाबत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असल्याचं पहायला मिळालं. अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला, मी खूप वेळा पाहायचो की ह्या मालिकेनं 100… Continue reading सिद्धार्थ जाधवने केली भावनिक पोस्ट, काय आहे कारण..?

रिलायन्स फाउंडेशनने 5 हजार अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्तींची यादी केली जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रिलायन्स फाउंडेशनने अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देशभरातून 5 हजार विद्यार्थ्यांची निवड केली आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी धीरूभाई अंबानी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त जाहीर करण्यात आली. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी 1 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 70 %… Continue reading रिलायन्स फाउंडेशनने 5 हजार अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्तींची यादी केली जाहीर

मेन राजाराम मध्ये क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक समृद्ध वारसा असलेल्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये दोन दिवशीय क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. प्रशालेचे प्राचार्य डॉ गजानन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख अतिथी आदर्श माजी क्रीडा शिक्षक आणि लोकनियुक्त सरपंच बी. सी. कदम, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके,… Continue reading मेन राजाराम मध्ये क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ..!

ग्रामीण रुग्णालयांच्या बेडची क्षमता वाढवण्याची मागणी मंत्री मुश्रीफांनी मंत्री आबिटकरांकडे केली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल आणि मुरगुड येथील ग्रामीण आरोग्य केंद्रांची बेड क्षमता प्रत्येकी 30 वरून 100 बेड इतकी वाढवा, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. या दोन्हीही दवाखान्यांमध्ये नवीन विभागांसह डायलिसिस सेंटरही अत्यावश्यक असल्याने तेही सुरू करा, अशी मागणीही मंत्री मुश्रीफ यांनी केली आहे. यासंदर्भात मंत्री… Continue reading ग्रामीण रुग्णालयांच्या बेडची क्षमता वाढवण्याची मागणी मंत्री मुश्रीफांनी मंत्री आबिटकरांकडे केली

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून पक्ष संघटना बळकट करा..; महाराष्ट्र सैनिकांची मागणी

आदमापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत पक्षाची शिस्त मोडून बेशिस्तपणे पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करा आणि अनेक वर्षे एकाच पदावर राहून काम न करणाऱ्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करा मनसेच्या कोल्हापूर ग्रामीण मधील पदाधिकारी मेळाव्यात महाराष्ट्र सैनिकांची मागणी. हॉटेल त्रिशा आदमापूर येथे मनसेची संवाद बैठक पार पडली. महिन्याभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापूर ग्रामीण… Continue reading निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून पक्ष संघटना बळकट करा..; महाराष्ट्र सैनिकांची मागणी

‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण.. : अरुण डोंगळे

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत 2025 या नवीन वर्षाच्या गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक माहिती तसेच गोकुळ सौर… Continue reading ‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण.. : अरुण डोंगळे

error: Content is protected !!