Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
#kale Archives -

सावर्डेतील विद्यार्थी 5 वर्षे शिक्षकाच्या प्रतिक्षेत ; रिक्त पद न भरल्यास शाळेस टाळे लावण्याचा पालकांचा इशारा..!

कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फ असंडोली ( ता.पन्हाळा ) येथील जि. प. प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यत वर्ग असून एकूण विद्यार्थी पटसंख्या 100 आहे. लोक वगर्णीतून उभा केलेली सर्व सोयीनीयुक्त आणि सुसज्ज अशी इमारत आहे. एकूण मंजूर शिक्षक पदे 5 असून कार्यरत 4 आहेत. त्यापैकी अध्यापक 3, विज्ञान विषय शिक्षक एक आहे. तर भाषा… Continue reading सावर्डेतील विद्यार्थी 5 वर्षे शिक्षकाच्या प्रतिक्षेत ; रिक्त पद न भरल्यास शाळेस टाळे लावण्याचा पालकांचा इशारा..!

पुनाळला बहुजनाच्या वतीने निषेध सभा संपन्न..!

कळे (प्रतिनिधी) : पुनाळ ( ता.पन्हाळा ) येथील बुध्दविहार मध्ये सर्व बहुजनांच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी संसदेत भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काढलेल्या अपशब्दाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी. तसेच परभणी येथे एका व्यक्तीने संविधानाची केलेली विटंबाना त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी बहुजनाच्या वतीने केलेल्या आंदोलनातील न्यायालायीन कोठडीत पोलीसांनी केलेल्या… Continue reading पुनाळला बहुजनाच्या वतीने निषेध सभा संपन्न..!

कळे विद्यामंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार…

कळे (प्रतिनिधी) : भाषेला ट्रान्सलेटर असतो पण कर्तुत्वाला ट्रान्सलेटर नसतो, कर्तुत्व हे स्वतः सिद्ध करावे लागते. त्यासाठी महापुरुषांच्या चरित्राचे वाचन आणि त्यावर मनन करणे आवश्यक असते. तसेच ध्येयाने झपाटून जावे लागते. आई-वडिल हेच आपले आद्य दैवत असून त्यांना कधीही दुःख देऊ नका असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते शरद तांदळे यांनी केले.  ते कळे विद्यामंदिर आणि… Continue reading कळे विद्यामंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार…

प्रकाश भोसले लिखित “बापाचं काळीज” ला सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार जाहीर..! 

कळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद, शाखा पलूस आणि स्वामी विवेकानंद ग्रामीण विकास मंडळ, पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये दिला जाणारा अण्णाभाऊ साठे स्मृति सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार प्रकाश भोसले लिखित ‘बापाचं काळीज’ कथासंग्रहास जाहीर झाला.  प्रकाश भोसले यांचा बापाचं काळीज हा ग्रामीण भाषेतील कथासंग्रह असून या कथासंग्रहाने गावगाड्याचे अंतरंग, गावगाड्यातील… Continue reading प्रकाश भोसले लिखित “बापाचं काळीज” ला सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार जाहीर..! 

भूकंपसदृश धक्क्याने कळे परिसर हादरला..!

कळे (प्रतिनिधी) : भूकंपसदृश धक्क्याने कळे (ता.पन्हाळा) परिसरातील सुमारे 2 किलोमीटरचा परिसर हादरला. आवाज आणि धक्क्याची तीव्रता इतकी होती की कळे, मल्हारपेठ, मरळी, पुनाळ आदी गावांमध्ये नागरिक घराबाहेर आले. अनेक महिन्यांपासून असे धक्के जाणवत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कळे परिसरात भूकंप… Continue reading भूकंपसदृश धक्क्याने कळे परिसर हादरला..!

धामणी खोऱ्यात सुगीची धांदल ; भात, भुईमुग, नाचणी पिके काढण्यात शेतकरी व्यस्त..!

कळे (प्रतिनिधी) : पावसाने उघडीप दिल्याने निसर्गाने भरभरून दिलेले दान पदरात पाडून घेण्यासाठी धामणी खोऱ्यात बळीराजाची सुगीची धांदल उडाली असून भात, भुईमुग, नाचणी पिके काढण्यात बळीराजा व्यस्त आहे. सर्वत्र शिवार फुलल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.धूळवाफ पेरणी आणि रोप लागण झालेल्या खरीप भातपिकांना यंदा दमदार पाऊस झाल्याने पिके जोमात आली आहेत. कमी शेतीक्षेत्र असलेल्या… Continue reading धामणी खोऱ्यात सुगीची धांदल ; भात, भुईमुग, नाचणी पिके काढण्यात शेतकरी व्यस्त..!

कोल्हापूरात चौथी धम्म परिषद संपन्न

कळे (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील फुलेवाडी येथे चौथी बौद्ध धम्मपरिषद संपन्न झाली. या बौध्द धम्म परिषदेचे उद्घाटन माजी शिक्षण आयुक्त महावीर माने यांच्या हस्ते झाले.  बौध्द धम्म परिषदेचे धव्जारोहण मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष तानाजी घरपणकर यांच्या हस्ते झाले. परिषदेचे स्वागताध्यक्ष  कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय कुर्डुकर हे होते आणि चौथ्या धम्मपरिषदेचे अध्यक्ष सामाजिक विचारवंत… Continue reading कोल्हापूरात चौथी धम्म परिषद संपन्न

सुप्रिया मोहिते यांना राज्यस्तरीय “व्यसनमुक्ती – मधुमेहमुक्ती ” पुरस्कार प्रदान

कळे (प्रतिनिधी) : समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या संस्थेकडून दरवर्षी राज्यभरात सामाजिक कार्य करून लाखो लोकांना व्यसनमुक्त – मधुमेहमुक्त करण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा “राज्यस्तरीय व्यसनमुक्ती – मधुमेहमुक्ती दूत” हा पुरस्कार या वर्षी कोल्हापूर येथील सुप्रिया दिलीपराव मोहिते यांना लाभला आहे. कोल्हापुरातील सयाजी हॉटेल येथे समर्थ सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, संचालक… Continue reading सुप्रिया मोहिते यांना राज्यस्तरीय “व्यसनमुक्ती – मधुमेहमुक्ती ” पुरस्कार प्रदान

मोरेवाडीतील तरूणाचा प्रामाणिकपणा, सापडलेले पाकीट केले परत…

कळे (प्रतिनिधी) : महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून समाजात अजूनही प्रामाणिकपणा टिकून असल्याचे उदाहरण मोरेवाडी ( ता.पन्हाळा ) येथे पाहावयास मिळाले. मोरेवाडी ( ता.पन्हाळा ) येथील सुभाष गणपती पाटील हे सावर्डे येथे कामानिमित्त येत असताना त्यांना मल्हारपेठ – सांगरूळ मार्गावरती मोरेवाडीजवळ रस्त्यावरती हरवलेले पाकीट सापडले. पाटील यांनी पाकीट पाहीले असता काही महत्वाची कागदपत्रे… Continue reading मोरेवाडीतील तरूणाचा प्रामाणिकपणा, सापडलेले पाकीट केले परत…

कळे येथे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन 

कळे ( प्रतिनिधी ) : अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधन वाढ देण्याचे महिला व बालविकास मंत्री यांनी मान्य केले आहे. परंतु अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्याचे मान्य केले असून तसेच, सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटी  देण्याचे मान्य केले आहे. तथापि याबाबत सुद्धा अद्याप कोणता निर्णय झालेला नाही. अशा स्थितीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र… Continue reading कळे येथे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन 

error: Content is protected !!