करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी चरणी 45 तोळे सोन्याची प्रभावळ अर्पण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला, खा. धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्‍या, करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाई देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ देण्यात आली. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्या हस्ते ही प्रभावळ देवस्थान समितीकडं सुपूर्द करण्यात आली. 45 तोळे वजनाचे सोने यासाठी वापरण्यात आले असून, त्याची किंमत 35 लाख… Continue reading करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी चरणी 45 तोळे सोन्याची प्रभावळ अर्पण

कॉंग्रेसनं साधा चमचा तरी दिला का..? ; खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सर्वसामान्य कष्टकरी आणि श्रमिक जनतेचा विचार करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्‍यांसाठी किसान योजना, निराधार महिलांना उज्वला गॅस योजना, मोफत उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना यासह 5 वर्षे मोफत रेशनधान्य दिले. तर ‘महायुती सरकारने महिलांना प्रत्येकी 1500 रूपये दिले आहेत’. 68 वर्षांच्या कार्यकाळात कॉंग्रेसने साधा चमचा तरी दिला का..?असा प्रश्‍न… Continue reading कॉंग्रेसनं साधा चमचा तरी दिला का..? ; खा. धनंजय महाडिक

खंडपीठाचा प्रश्न आचारसंहितेपूर्वी …! सर्वपक्षीय बैठकीत ठराव

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यासोबत बैठक घेऊन कोल्हापूर खंडपीठाच्या प्रश्नाला सकारात्मक निर्णय घेण्याचा ठराव सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. छत्रपती शाहू महाराज होते. आ. सतेज पाटील काय… Continue reading खंडपीठाचा प्रश्न आचारसंहितेपूर्वी …! सर्वपक्षीय बैठकीत ठराव

जिल्ह्यातील 40 कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते ; कोल्हापुरात खा. महाडिकांची उपस्थिती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील निवडक 1 हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचा तसेच विविध उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास , रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील 40… Continue reading जिल्ह्यातील 40 कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते ; कोल्हापुरात खा. महाडिकांची उपस्थिती

पहिली वंदे भारत एक्सप्रेस आज कोल्हापूरहून पुण्याला रवाना

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : पहिली वंदे भारत एक्सप्रेस चाचणीकरिता कोल्हापुरहून पुण्याला आज 10 : 25 मिनिटांनी रवाना झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे सोमवारी दुपारी सव्वा चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यामुळे आज चाचणी घेण्याचा निर्णय… Continue reading पहिली वंदे भारत एक्सप्रेस आज कोल्हापूरहून पुण्याला रवाना

कोल्हापूर – पुणे या मार्गावर सोमवारपासून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : हुबळी ते पुणे या मार्गावर नव्याने सुरू होणार्‍या वंदे भारत एक्सप्रेसला, कोल्हापूरचा थांबा देण्यात आला असल्याने काही नवे वाद निर्माण झाले होते. त्यानंतर खा. धनंजय महाडिक यांच्यासह कोल्हापुरातील अन्य काही लोकप्रतिनिधींनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, कोल्हापूरसाठी स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस देण्याची मागणी केली. त्यानुसार आता आठवड्यातील 3 दिवस,… Continue reading कोल्हापूर – पुणे या मार्गावर सोमवारपासून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

राज्यात येत्या काळात 5 लाख उद्योजक तयार करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे : नरेंद्र पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून ठरविण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करीत राज्यात 1लाख मराठा उद्योजकांना बँक कर्ज व्याजाचा परतावा देण्यात आला. आता राज्यात येत्या काळात 5 लाख मराठा उद्योजक बनविण्यासाठी बँकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले. महामंडळाच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व मराठा उद्योजकांपर्यंत ही… Continue reading राज्यात येत्या काळात 5 लाख उद्योजक तयार करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे : नरेंद्र पाटील

खा. महाडिकांचा माजी पालकमंत्र्यावर जोरदार निशाणा , म्हणाले …

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : जिल्ह्यात त्यांचे सहा आमदार असून,महापालिका ,जिल्हापरिषद,गोकूळ ,जिल्हा बँक सगळी सत्ता त्यांच्याच हाती असून सुद्धा कोल्हापूरचा विकास झाला नाही .शहरातील रस्ते व कचऱ्यांचा प्रश्न अजून तसाच आहे . माजी पालकमंत्र्यांना कोल्हापूर अविकसित ठेवायचे आहे . त्यांनी केलेले काम दाखवा तीन लाखाचं बक्षीस देतो अशी टीका खा . धनंजय महाडिकांनी युवा शक्तीच्या दहीहंडी… Continue reading खा. महाडिकांचा माजी पालकमंत्र्यावर जोरदार निशाणा , म्हणाले …

27 ऑगस्टला युवाशक्ती दहीहंडीचा कोल्हापुरात थरार ,रंगणार प्रथम क्रमांकास ‘ही’ रक्कम मिळणार ..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणेच ह्यावर्षीही कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. मंगळवार दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी ठिक 4 वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील 3 लाख रूपयांचे बक्षिस पटकवण्यासाठी यंदाही गोविंदा पथकांची चुरशीची लढत रंगणार आहे.… Continue reading 27 ऑगस्टला युवाशक्ती दहीहंडीचा कोल्हापुरात थरार ,रंगणार प्रथम क्रमांकास ‘ही’ रक्कम मिळणार ..

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या : खा.धनंजय महाडिक

दिल्ली : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली. अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील शोषित आणि दुर्लक्षित वर्गासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची चळवळ मजबुत केली. अण्णाभाऊ साठे यांचे केवळ साहित्यीक योगदान नसुन, सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांना भारतरत्न सारख्या… Continue reading लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या : खा.धनंजय महाडिक

error: Content is protected !!