छगन भुजबळांकडून नाराजीचे सूर ; भुजबळांचा पुरेपूर वापर… : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रीमंडळ विस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील राजभवनात रविवारी संपन्न झाला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे. त्यामुळे छगन भुजबळानी… Continue reading छगन भुजबळांकडून नाराजीचे सूर ; भुजबळांचा पुरेपूर वापर… : संजय राऊत

मनसेचा ‘हा’ बडा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मंत्रीमंडळ विस्ताराआधी भेट घेतल्याने चर्चांना उधाण…

मुंबई (प्रतिनिधी) : महायुतीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या नागपुरातील राजभवनात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीला येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अनेक राजकीय नेते भेट घेण्यासाठी येत आहेत. अशातच आता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सागर बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मुलाच्या लग्नाची… Continue reading मनसेचा ‘हा’ बडा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मंत्रीमंडळ विस्ताराआधी भेट घेतल्याने चर्चांना उधाण…

मंत्रीमंडळ विस्ताराची यादी दिल्लीत पोहोचली ; अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीला

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रीमंडळ विस्तार उद्या नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रीमंडळ विस्ताराआधीच अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेत असल्याचं पहायला मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबतची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पाठवली असून त्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब आज दुपारी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर काही नेते उपमुख्यमंत्री… Continue reading मंत्रीमंडळ विस्ताराची यादी दिल्लीत पोहोचली ; अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीला

दूध उत्पादकांच्या अडचणी दूर करण्याचं निवेदन आ. महाडिकांनी मुख्यमंत्र्यांना दिलं

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील वर्षाभरामध्ये निर्माण झालेल्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे गाय दूध उत्पादकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पावडर आणि बटरचे अनियमित दर, बाजारपेठेतील गाय दुधाची घटलेली मागणी यामुळे गाय दुधाचा व्यवसाय खूप अडचणीत सापडला आहे. यातून दिलासा मिळावा म्हणून शासनाकडून गाय दुधाला अनुदान दिले गेले… Continue reading दूध उत्पादकांच्या अडचणी दूर करण्याचं निवेदन आ. महाडिकांनी मुख्यमंत्र्यांना दिलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. हसन मुश्रीफ यांनी केले अभिनंदन

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ना. देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा निवड झाली. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. मुंबईमध्ये विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमदार मुश्रीफ यांनी अभिनंदन केले. शुभेच्छा देताना आमदार मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून आपल्या नेतृत्वाखाली येत्या पाच वर्षात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होवो.… Continue reading मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. हसन मुश्रीफ यांनी केले अभिनंदन

आ. अमल महाडिकांनी केली देवेंद्र फडणवीसांवर भावनिक पोस्ट..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला आ. अमल महाडिक यांनी उपस्थिती लावली होती. या शपथविधीनंतर आ. अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केलेल्या पहायला मिळत आहेत. आ. अमल महाडिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रेरणादायी आणि राजकीय प्रवासाचे एकंदरीत वर्णन या… Continue reading आ. अमल महाडिकांनी केली देवेंद्र फडणवीसांवर भावनिक पोस्ट..!

महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळणार : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि महायुतीला निर्विवाद कौल दिला. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे माझ्यासह तमाम भाजप कार्यकर्त्यांना आनंद आणि समाधान वाटत आहे. नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नूतन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातून महाराष्ट्राची अधिक गतिमान प्रगती होईल. पुढील 5… Continue reading महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळणार : खा. धनंजय महाडिक

भरत गोगावलेंनी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख केली जाहीर..!

मुंबई (प्रतिनिधी) : आज राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जाहीर केली असल्याची… Continue reading भरत गोगावलेंनी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख केली जाहीर..!

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी आझाद मैदान सज्ज..!

मुंबई (प्रतिनिधी) : आज आझाद मैदानावर 5 : 30 मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी आझाद मैदान सज्ज झाले आहे. आझाद मैदानात उभारलेल्या भव्य मंडपाच्या बाह्य पांढऱ्या कपड्याला आतील बाजूने भगव्या रंगाचे अस्तर लावण्यात आले आहे. खास आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठी सोफ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख… Continue reading मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी आझाद मैदान सज्ज..!

मुख्यमंत्री पदाचं नाव उशीरा जाहीर करण्यामागचं नेमकं कारण काय..?

मुंबई (प्रतिनिधी) : आज भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. उद्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करायला इतका उशीर का होत आहे या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र, आज मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित केल्यानंतर… Continue reading मुख्यमंत्री पदाचं नाव उशीरा जाहीर करण्यामागचं नेमकं कारण काय..?

error: Content is protected !!