श्री नृसिंह सरस्वती मंदिरास 2 कोटींचा निधी ; अमल महाडिकांच्या पाठपुराव्यास यश

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निगवे खालसा गावात असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी मंदिरास महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधीतून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यातून हा निधी प्राप्त झाला असून या निधीतून देवालयाच्या सुशोभीकरणासह विविध विकास कामे केली जाणार आहेत. या निधीपैकी… Continue reading श्री नृसिंह सरस्वती मंदिरास 2 कोटींचा निधी ; अमल महाडिकांच्या पाठपुराव्यास यश

दूधगंगा डावा कालवा प्रकल्पाच्या कामांसाठी 176 कोटींचे अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश

कोल्हापूर : कोल्हापुरातील दुधगंगा डावा कालवा येथील कामांस प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. आता या कामाबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबद्दल अमल महाडिक यांनी समाधान व्यक्त केले. दुधगंगा डावा कालवा कि. मी. 1 ते कि.मी. 15 मध्ये यांत्रिकी पध्दतीने आस्तरिकरण व बांधकामे… Continue reading दूधगंगा डावा कालवा प्रकल्पाच्या कामांसाठी 176 कोटींचे अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश

अमल महाडिकांचा पाठपुरावा ; ‘दक्षिण’ साठी 29 कोटींचा निधी मंजूर

कोल्हापूर : नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी तब्बल 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली होती. या रस्त्यांच्या डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरणासाठी भरीव निधी मिळावा अशी मागणी महाडिक यांनी केली… Continue reading अमल महाडिकांचा पाठपुरावा ; ‘दक्षिण’ साठी 29 कोटींचा निधी मंजूर

नव मतदार – लाडकी बहीण योजना नोंदणीला कोल्हापूर ‘दक्षिण ‘मध्ये भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर : माजी आमदार अमल महाडिक यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नव मतदार नोंदणी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थी नोंदणीसाठी बूथनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 जुलै पासून कोल्हापूर शहरात या शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात नव मतदार नोंदणी अभियानाला युवा वर्गातून उदंड प्रतिसाद लाभला. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने… Continue reading नव मतदार – लाडकी बहीण योजना नोंदणीला कोल्हापूर ‘दक्षिण ‘मध्ये भरघोस प्रतिसाद

error: Content is protected !!