मुंबई : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी मिरची पूड टाकून हल्ला केला. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मिडिया खात्यावर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.“गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध” अशी पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय.
काय लिहिलंय ‘x’ पोस्टमध्ये ?
इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी मिरची पूड टाकून हल्ला केला. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधलाय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ” इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध.”