पुणे – पुण्यातील हिट अँड रन केस सध्या चांगलंच चर्चेत आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी एक घटना घडली होती. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलगा विशाल अग्रवाल याने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामुळे आता वेदांत अग्रवालचं पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले असताना. या घटनेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापले. राज्यातील बडे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणालया सुप्रिया सुळे..?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, . पुण्यामध्ये अनेक घटना घडल्या आहेत पण पुण्याचे पालकमंत्री कुठे? असा सवाल शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला असून अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तर देवेंद्र फडणवीस नेमकं कोणाबद्दल बोलत होते? राजकीय दबाव नेमका कुणाचा? असा सवाल करत फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर कुणी फोन केला? कुणामुळे जामीन मिळाला हे देवेंद्र फडणवीसांनी सांगाव, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला. आता यावर दोन्ही उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.