राधानगरी (प्रतिनिधी) : वाडयावस्त्यावरील विखरुलेल्या राधानगरी मतदार संघ पायाभूत मुलभूत सुविधेच्या गर्तेत अडकला आहे.विकासाला निश्चीत स्वरूपाचा न्याय देण्यासाठी लोकशाहीच्या लढाईत ठोकशाहीचा पाडाव करण्यासाठी मला साथ द्या अशी साद के.पी .पाटील यांनी आजरा येथे आयोजित केलेल्या शिवसेना मेळाव्यात घातली.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजीराव पाटील होते. यावेळी प्रास्ताविक संजय येजादे यांनी केले.
यावेळी पाटील बोलताना पुढे म्हणाले,शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेला जनतेचा निष्ठेचा धागा आजऱ्यात रुजलेला आहे.गद्दार अशी ओळख ठरलेल्या आ.अबिटकरांचे बद्दल नाराजी मोठ्या प्रमाणात आहे.सत्तेच्या खेळात निष्ठेला विसरण ही गोष्ट शिव सैनिकासाठी वेदनादायी आहे.त्यांना आता घरी बसवण्यासाठी सर्वानी सतर्क रहा असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमूख संभाजीराव पाटील म्हणाले,गद्दारी करणाऱ्या आमदारामूळे राजकारणात सत्ता आणि निष्ठा याची सीमारेषा आखली गेली आहे.सत्तेच्या मोहापायी बाजू बदलणाऱ्या आ.अबिटकरांना निष्ठेची मशाल त्यांची त्यांना जागा दाखविणार स्वाभिमानी मशाल या मोहीमेची सुरवात मतदारसंघात घरोघरी दारोदारी नव्या संपर्काने पोहचविणार आहे.के.पी.पाटील यांच्या पारदर्शि नेतृत्वाला विधानसभेत पाठवून राधानगरीत एक नवा इतिहास घडवणार आहे.यावेळी दयानंद भोपळे, युवराजदादा पोवार, विश्वनाथ कुंभार यांची मनोगते झाली.प्रसंगी प्रा.सुनिल शिंत्रे,राजेंद्र सावंत,शिवाजी आडाव,सुरेश चौगले, प्रसाद पिल्लारे,अनिल केरकर, आदिसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते आभार नंदकुमार भोपळे यांनी मानले