मुंबई (प्रतिनिधी): सनी देओलचा ‘जाट’ हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झालेल्या 5 दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला आहे. या चित्रपटाने 4 दिवसांत एकूण 40.62 कोटी रुपये कमावले आहे. जाट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी केलं आहे. सनी देओलचा ‘जाट’ बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. सोबतच नेटाफिल्स या ओटीटी वरती देखील या चित्रपट रिलीज झाला.
‘जाट’ ची बॉक्स ऑफिस वर कमाई
‘जाट’नं पहिल्या दिवशी 9.62 कोटी, दुसऱ्या दिवशी 7 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 9.95 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी 14.05 कोटी रुपये कमवले .
‘जाट’ चा रेकॉर्ड
‘जाट’नं सनी देओलच्याच 1997 साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बॉर्डर’चा लाईफटाईम कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आहे. सनी देओलच्या बॉर्डर या चित्रपटाने 39.46 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आता, ‘जाट’ हा सिनेमा 2011 मध्ये आलेल्या ‘यमला पगला दीवाना’ (55.28 कोटी रुपये) आणि 2001 मध्ये आलेल्या ‘गदर’ (76.88 कोटी रुपये) या चित्रपटांना मागे टाकून रेकॉर्ड ब्रेक सिनेमा बनेल का ?
‘जाट’ मधील कलाकार
‘जाट’ हा सिनेमा मैत्री मूव्ही मेकर्स या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवण्यात आले आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 100 कोटी रुपये आहे. सनी देओलनं ‘जाट’मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच, नकारात्मक भूमिकेत दिसणारा रणदीप हुड्डा दिसणार आहे.
विक्की कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटात कवी कलेशची भूमिका साकारणारा विनित कुमार सिंह देखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. रेजिना कॅसांड्रा, जगपती बाबू, सैयामी खेर आणि राम्या कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.