टोप ( प्रतिनिधी ) : हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचे संमतीने लोकप्रिय खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी वैशाली डोंगरे यांचे हस्ते महिला आघाडी आघाडीची बांधणी व पदाधिकारी याचे नेमणुकीचे पत्र वाटपाचा कार्यक्रम बुधवार दिनांक २२ जानेवारी रोजी रुईकर कॉलनी येथे पार पडला.
माजी उपसरपंच किरण चौगुले यांच्या पत्नी सुधा किरण चौगुले याची शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुख तसेच महिला बचत गटाच्या पुनम शीतल खाडे यांची शिवसेना महिला आघाडी शिरोली विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र लोकप्रिय खासदार धैर्यशील माने आणि शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी वैशाली डोंगरे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. निवड झालेल्या महिला पदाधिकारी यांना पुढील राजकीय वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी वृषभनाथ बाळगोंडा पाटील शिवसेना हातकांगले तालुका सरचिटणीस हे उपस्थित होते.