कोल्हापूर ( प्रतिनिधी) – गांधीनगर कात्यायनी वसगडे मोरेवाडी तामगाव उंचागाव मुडशिंगी, वळीवडे सह दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातीलविविध गावांना माजी आमदार भाजप नेते अमल महाडिक यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे
कळंबा नजिकच्या नवदुर्गापैकी घातलेल्या आणि पौराणिक संदर्भातल्या कात्यायनी देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 49 लाख रुपये चा निधी मंजूर झाला आहेयासह तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे वसगडे गावातील नरसिंह मंदिराच्या सभा मंडप आणि परिसर विकासासाठी 99 लाख रुपये चा निधी मंजूर झालेला आहे. उचगाव येथील मंगेश्र्वर देवस्थानच्या सभा मंडपासाठी 99 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे.
तर वसगडेमधीलच विठ्ठल बिरदेव मंदिरात सभामंडप रस्ते कॉम्प्लेक्स यासाठी 90 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. यासह मोरेवाडी तासगाव गांधीनगर कोसगाव नांदगाव मुडशिंगी वळीवडे आदी गावातील रस्ते तसेच विविध स्थानिक सुविधांसाठी तब्बल 200 कोटीचा निधी हा आमदार माजी आमदार अमल महाडिक यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्यातून आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे.
त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे गेली पाच वर्षे सातत्याने कोल्हापूर दक्षिणच्या विविध ग्रामीण भागात तसेच महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागात अमल महाडिक हे विविध माध्यमातून संपर्कात आहेत आणि आपल्या संघटक कौशल्य जोरावर विविध गावांसाठी भरगोस निधी मिळवून दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत तेच आमदार व्हावे अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त होत आहे