कोल्हापूर, (प्रतिनिधी ) : केंद्र शासन सहाय्यक प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिका सूची तयार करावयाची आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून दिनांक 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

जिल्हा संसाधन व्यक्तीसाठी शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेतून पदवी, पदव्युत्तर पदवी इत्यादी

प्राधान्य – विद्यापीठ, मान्यता प्राप्त संस्था यांचे कडील अन्न तंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी मधील पदविका, पदवी इत्यादी. कृषी व कृषी संबंधित पदव्युत्तर पदवी इत्यादी किंवा अनुभवी सेवा पुरवठा संस्था. संगणक ज्ञान सक्तीचे आहे. अर्जदार कोणत्याही शासकीय, निमशासकीय सेवेत कर्मचारी नसावा.
अनुभव – कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व बँकेशी पाठपुरावा करून प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी कर्ज मंजुरी प्रक्रिया, एमआयएस (mis) पोर्टलवरील योजना व शासकीय योजनांचे कृती संगम याबाबत अनुभव असणे आवश्यक आहे.

योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता, परिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ www.krishimaharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, चाळीस ठाणा, भगवा चौक, कसबा बावडा,( ई-मेल pmfmekolhapur@gmail.com) दूरध्वनी 0231-2654603 वर संपर्क साधावा.