कळे(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत प्राथमिक विभागामध्ये विद्या मंदिर पोहाळवाडी शाळेचे पदवीधर अध्यापक व जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सुभाष नारकर यांचा तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय या व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये त्यांनी इयत्ता 3 री ते 5 वी या गटामध्ये इयत्ता 5 वी इंग्रजी विषयाचा शाळेतील विद्यार्थीनी श्रेया बाजीराव भोगले या विद्यार्थीनीचा सहभाग घेऊन हा व्हिडीओ बनविला.यापूर्वी देखील जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिक्षकांच्या घेतलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेत सुभाष नारकर यांचा प्रथम क्रमांक आला आहे.व्हिडीओ निर्मितीसाठी त्यांना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर, केंद्रप्रमुख सरदार सरनोबत,मारुती खोत,शाळेचे मुख्याध्यापक माधव गायकवाड,अमर वरुटे,डाकरे,चिंचणे यांचे सहकार्य लाभले.