पन्हाळा (प्रतिनिधी) : संजीवनच्या विद्यार्थ्यांनी स्वतः मधील सामर्थ्य ओळखावे,छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये स्वकर्तुत्वाने स्वतःचे जीवन घडवावे.असे मत संजीवन ज्ञानासमूहाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रथम क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थी तसेच कला,क्रीडा,वक्तृत्व,नाट्य-अभिनय अशा विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि गुरुजनांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यासंदर्भात बानुगडे पाटील यांनी ऑलिंपिक खेळामधील विविध खेळाडूंच्या जिद्दीची आणि यशाची कहाणी सांगितली. तसेच कवी कालिदास यांची साधनेतून साकारलेले विद्वत्ता,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत नियोजनबद्ध स्वराज्य कार्य, नरवीर शिवा काशीद यांची समर्पण भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी संजीवन ज्ञानासमूहाचे चेअरमन पी.आर.भोसले, सह-सचिव एन.आर.भोसले, स्पोर्ट्स डायरेक्टर सौरभ भोसले, के.के.पोवार,बी.आर. बेलेकर,शिल्पा पाटील सांगावकर,महेश पाटील, पी.एन.पाटील, शिक्षक, पालक उपस्थित होते.