राधानगरी ( प्रतिनिधी ) : राधानगरी तालुक्यातील कूपलेवाडी गावातील साधना पांडुरंग टिंगे वय वर्ष 18 या विद्यार्थिनीला बारावी सायन्समध्ये 48% गुण प्राप्त झाले होते. पण हे गुण कमी असल्याची खंत तिच्या मनात सलत राहिली आणि अखेर तिने नैराश्याच्या भावनेतून कमी गुण मिळाल्याने पुतणी साधना हिने गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घरातील तुळीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद दगडू लहू टिंगे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली. मयताचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके यांनी केला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या आदेशाने पोलीस नाईक पाटील करत आहेत.







