कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. जस जशी विधानसभा निवडणूका जवळ येत आहेत तशतशी प्रचारांत रंगत येत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी मतदार संघात राहुल आवडे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. आज राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथील नारायण नगर व लालनगर येथून प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार पदयात्रा संपन्न झाली.

या पदयात्रेने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण केले.पदयात्रेला प्रारंभ करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. पदयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी राहुल आवडे यांचे स्वागत करून औक्षण केले. ज्यामुळे या उपक्रमाला आणखी रंगत आली. पदयात्रेचा शेवट सांगता समारंभाने करण्यात आली . यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आपल्या राजकीय दृष्टिकोनाबद्दल आणि कार्यकाळात त्यांनी केलेल्या प्रगतीच्या योजनांबद्दल माहिती दिली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान केले की, ते स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावेत आणि प्रत्येक मतदाराशी संवाद साधावा.

या भव्य पदयात्रेमुळे स्थानिक स्तरावर जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महायुतीच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि नागरिकांच्या समर्थनामुळे या पदयात्रेने स्थानिक राजकारणात नवीन ऊर्जा भरली आहे.

यावेळी भाजप चे प्रमुख पदाधिकारी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते, नागरिक, महिला व बूथ कमिटी मेम्बर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.