गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील खोकुर्ले गावातील पोलीस पाटील कैलास इंजर यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी. पोलीस पाटील कैलास इंजर यांनी तरुण युवकांना खोट्या तक्रारी देऊन जाणीवपूर्वक अडकवण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर पोलीस पाटलांनी गावातील काही मुलींना फुस लावून पळवून नेण्यासाठी संबंधित लोकांना मदत आणि सहकार्य केले आहे. याच कारणावरून गावात कायम वाद विवाद होत आहेत.

तसेच गावातून दुचाकी गाडी फिरवत असताना खुन्नस ठेवून काही तरुणांना गाडी घासून मारणे, जाणून-बुजून कळ काढून दमदाटी करणे, भांडण काढून त्यांना मारहाण करणे. त्याचबरोबर पोलीस पाटील कैलास इंजर यांच्या बाबतीत गावातून आणि परिसरातून अनेक तक्रारी असून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. अशा आशयाचे आणि तक्रारींचे निवेदन प्रांताधिकारी प्रांत करवीर यांना देण्यात आले.

यावेळी खोकुर्ले पैकी पडळवाडी येथील विलास वरेकर, बाजीराव म्हेत्तर, पांडुरंग गायकर, भाऊसो इंजर, भिकाजी तटकरे, निलेश म्हेत्तर्, तुकाराम वरेकर, सूनिल तटकरे,अमर म्हेत्तर आदी उपस्थित होते.