कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दिनांक 19 आणि 20 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन आणि मुक्काम करणार आहेत.
शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा नियोजन भवन, कोल्हापूर येथे जनसुनावणीस उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 ते 2.30 वाजता राखीव आणि दुपारी 2.30 ते 3.30 वाजता जिल्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी 3.30 ते 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहेत. सायंकाळी 4 ते 6 वाजता महिला संघटनांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता कोल्हापूर येथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण करणार आहेत.