कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महिला आणि बालकल्याण समिती आणि दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातर्फे सासणे ग्राऊंड येथे आजपासून खाद्य महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. महापालिकेसह जिल्ह्यातील इतर नगरपरिषद, नगरपालिकांतील नावीन्यपूर्ण उत्पादने असणारे 80 महिला बचत गट त्यामध्ये सहभागी झालेले आहेत.

प्रशासक कार्तिकेयन एस., अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, उज्ज्वला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश कांबळे, महिला आणि बालकल्याण अधीक्षक प्रीती घाटोळे, निवास कोळी, रोहित सोनुले, विजय तळेकर, स्वाती शहा आणि अंजली सौंदलगेकर, वृषाली पाटील यांनी महोत्सवासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. सलग तीन दिवस सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.