चेन्नई – साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाने सर्व चाहत्यांच्या मनावर राज्य केली आहे. रजनीकांत यांची सोमवारी रात्री उशिरा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांनी प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
रजनीकांत यांच्या काल रात्री पोटात दुखत असल्याने त्यांना रात्री उशिरा चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, कार्डियाक कॅथ लॅबमध्ये तीन तज्ञांच्या टीमने त्याच्या पोटाच्या खालच्या भागाजवळ एक स्टेंट ठेवला होता. या प्रक्रियेचे नेतृत्व इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. साई सतीश यांनी केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना 2-3 दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांची हृदयशस्त्रक्रिया करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत त्यांच्या कुली या आगामी चित्रपटाचे शुटींग करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत, नागार्जुन, सौबिन शाहीर, श्रुती हासन, सत्यराज आणि उपेंद्र मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.