कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ हवेली शाळा क्रमांक १ येथील सागाच्या झाडांमुळे मुलांना आणि ग्रामस्थांना धोका निर्माण झाला होता. ती झाडे हटवावीत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश तेली यांनी केली होती. तसेच शाळा व्य्वपस्थापन समितीच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या प्रयत्नांना यश येऊन १९ पाकी १० झाडे हटविण्याचा वनविभागाने परवानगी दिली आहे.
कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फे हवेली शाळा क्र १ येथील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. वादळी वाऱ्यामुळे १९ सागाच्या धोकादायक झाडांपैकी १ झाड उन्मळून पडल्यामुळे पालकांनी ५ दिवस मुलांना शाळेत पाठवले नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या माध्यमातून तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले यावेळी १० झाडे हटविण्यासाठी उपवसंरक्षक वनविभाग सावंतवाडी यांच्याकडून आज परवानगी देण्यात आली.
यावेळी बाळकृष्ण मेस्त्री, महिपाल धुरी,रुपेश कदम,वैभव हिवाळेकर, आकांशा धुरी, शर्वरी सोनवडेकर, राखी सोनवडेकर,समिधा धुरी,सलोनी सोनवडेकर,अंकिता सोनवडेकर, मानसी सोनवडेकर, दर्शना कदम,.संतोष परब, प्रकाश धुरी, संदेश बळी, यशवंत धुरी,अमित सोनवडेकर, किशोर धुरी, पालक शिक्षक उपस्थित होते.