कोल्हापूर (प्रतिनिधी ) : हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर शहरातून आज शांतता फेरीचे आयोजन करण्यात आलं होतं. जगाला शांतीचा आणि एकात्मतेचा संदेश देणारे महंमद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शांतता फेरी काढून मुस्लिम समाजाने, सामाजिक एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला.
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांची जयंती शहरात ठिकठीकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने कोल्हापूर शहरातून शांतता फेरी काढण्यात आली. यातून सामाजिक एकात्मेचा आणि जगाला शांततेचा संदेश देखील देण्यात आला. इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस, ईद-ए-मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो. 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद होती. मात्र या काळात गणेशोत्सव असल्यानं, ईद-ए-मिलाद 16 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबर रोजी साजरी करण्याबरोबरच शहरातून शांतता फेरी याच दिवशी काढण्याचा निर्णय कोल्हापुरातील मुस्लिम समाजान घेतला होता.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील घुडनपीर दर्गा येथून या शांतता फेरीला सुरुवात करण्यात आली. राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे, यांचा उपस्थितीत या शांतता फेरीला सुरवात झाली .जगातील एका महत्त्वपुर्ण धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात, महंमद पैगंबर यांचे महत्वाचे स्थान आहे. मुस्लिम बांधवांमध्ये हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळ ही जयंती मुस्लीम धर्मियांनी मोठ्या उत्सहात साजरी केली. शहरात ठिकठीकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. महंमद पैगंबरांचा जयघोष, हातात झेंडे घेऊन या फेरीमध्ये मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. त्याचं बरोबर या शांतता फेरीच्या सुरुवातीला उंट आणि घोडे देखील होते. घोडनपीर दर्गा पासून गुजरी येथून ही फेरी, बाबुजमाल दर्गा येथे गेल्यानंतर या शांतता फेरीचा समारोप करण्यात आला. हजरत महंमद पैगंबर यांनी जगाला मानवतेची शिकवण आणि शांततेचा संदेश दिला. या निमिताने, देखील शांतता फेरी काढून, एकात्मतेचा आणि शांततेचा संदेश देण्यात आल्याच मुस्लीम बांधवांनी सांगितल.
यावेळी, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, लियाकत मुजावर, फिरोज सतारमेकर, रशीद काझी, मुस्तफा नुरानी, मुबारक काझी, अल्ताफ काझी, शकील मुतवल्ली, बालम झारी, शाहरुख गडवाले, फिरोज सतारमेकर,रशीद काजी, मुबारक काझी,अल्ताफ काझी,इरफान शेख, सय्यद पटेल,आसिफ सदरगे,साजिद मकानदार,महंमद छोटू,जमीर मिस्त्री,फायज शिकलगार ,ईद्रीस कच्ची,हर्षद कच्ची, रमजान बेहस्ती, सलमान मौलवी हमीद पाथरवट यांच्यासह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.