निपाणी (प्रतिनिधी) : निपामी तालुक्यातील सिदनाळ येथील पूल पावसाच्या संततधारेमुळे पाण्याखाली गेला आहे. या बंधाऱ्यावरून मोठया प्रमाणात वाहतूक होत असते. या बंधाऱ्यावरील हा पूल नवीन बांधण्यात आला होता. त्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत.
हा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे अकोळ, ममदापूर, पांगीर गावातील एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच हुनरगी, सिदनाळ, बोळेवाडी गावातील नागरिकांना तसेच निपाणी आणि इंचलकऱजीला जाणाऱ्या नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत.
उद्या (शनिवार) अकोळ गावचा आठवडी बाजार असल्याने सिदनाळ, हुनरगी, बोलेवाडीच्या नागरिकांना सौंदलगा मार्गे किंवा अन्य मार्गाने बाजारासाठी जावे लागणार आहे. या बंधाऱ्यावर आलेल्या पाण्यामुळे हुनरगी, अकोळ, ममदापूर या गावांचा संपर्क तुटला आहे.