कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय पटलावर मोठ्या उलाढाली पहायला मिळाले. याचं निमित्त होत बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं, याचा फैसला आज होणार असून, प्रत्यक्ष मतमोजणीला देखील सुरुवात झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार एकूण 120 टेबलवर ही मतमोजणी होत आहे. या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या निवडणुकीत एकूण 56 हजार 91 पैकी 49 हजार 940 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता 173 मतदान केंद्रावर सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. दोन्ही आघाडीचे 50 उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन आणि चार अपक्ष अशा 56 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झालं आहे. याची मोजणी आता सुरु झाली आहे.

या लढतीत सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडी असा दुरंगी सामना रंगला. या निवडणुकीमुळे आगामी विधानसभेसाठी सुद्धा बरंच चित्र स्पष्ट होणार असल्याने नेमकं या निवडणुकीमध्ये कोण लै भारी ठरणार ? आणि बिद्रीच्या चाव्या कोणाच्या कंबरेला ? याचं उत्तर सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे.