कोल्हापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या कोल्हापुरात बिद्री कारखाना निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान त्यांनी कोल्हापुरातील डॉ. राजू राऊत यांची देखील सदिच्छा भेट घेत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अवलीयांची यादी नुकतीच जाहीर झाली. यात कोल्हापूरमधून शिवशाहीर हा पुरस्कार डॉ. राजू राऊत यांना जाहीर झाला आहे. यानिमित्ताने पाटील यांनी राजूजींची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.

यात कोल्हापूरमधून शिवशाहीर हा पुरस्कार डॉ. राजू राऊत यांना जाहीर झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी राजूजींची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी अनेक विषयांवर अनौपचारिक संवाद साधताना कोल्हापूरची ऐतिहासिक परंपरा, किल्ले, पन्हाळ्यापासून ते शिवाजी पेठेपर्यंतच्या अनेक घडामोडी आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले.

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात आवाज उठवणारे कोल्हापूरचे छत्रपती चिमासाहेब यांचा दुर्लक्षित इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्यावर कादंबरी लिहिण्याचा मानस डॉ. राजू यांनी यावेळी व्यक्त केला. त्याला सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली. यावेळी महेश जाधव, राहुल चिकोडे, प्रकाश सरनाईक कोमल देसाई हे मान्यवर उपस्थित होते.