मुंबई (प्रतिनिधी) : सध्या लग्नसराईचा सीझन सुरू असल्याने अनेक कलाकार विवीहबंधनात अडकत असलेलं पहायला मिळत आहे. अशातच आता, शिवा मालिका फेम अभिनेता शाल्व किंजवडेकरने श्रेया डफळापूरकरसोबत नुकतील लग्नगाठ बांधली आहे.

मागील अनेक दिवसांपासून शाल्वच्या लग्नाची चर्चा सुरू होती. त्याचबरोबर, शाल्व किंजवडेकरने श्रेया डफळापूरकर यांच्या समारंभाचे फोटोही सोशल मीडियावर दिसत होते. पण आता त्यांच्या लग्नाचेही फोटो समोर येत आहेत. शाल्व आणि श्रेया एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करत होते. या दोघांनी लग्न करून लग्नबंधनाची गाठ बांधली आहे.

शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाचे फोटो त्यांच्या कलाकार मित्रांनी सोशल मीडियावर शेअर करत नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीनेही शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाचे फोटो शेअर केलेले पहायला मिळत आहेत.