टोप (प्रतिनिधी) : मौजे वडगाव येथे अवैद्य रित्या सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांची कारवाई तिन मोटरसायकल सह दोन चारचाकी गाड्यासह लाखोचा मुद्देमालासह पकडण्यात यश, शिरोली पोलिसांनी निर्जन ठिकाणी कारवाई केली. मौजे वडगाव ता. हातकणंगले येथील मौजे वडगाव ते नागाव दरम्यान असणाऱ्या ओढ्याच्या बाजूस एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या फार्म हाऊसवर अवैद्य रित्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शिरोली पोलिसाना मिळाल्याने शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या पथकाने सोमवारी रात्री 10 :30 वाजण्यासुमारास कारवाई केली.

अझरुददीन कलंदर पठाण वय 26 रा. आझाद चौक हेरले ता. हातकणंगले, सोहेल रफिक बारगीर वय 31 रा. आझाद चौक हेरले ता. हातकगणले जि. कोल्हापुर, दिपक आनंदा जाधव वय 27 रा. हेरले माळभाग ता. हातकणंगले,अनिकेत पोपट कालगे वय 27 रा. गंगारामनगर टोप ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, सुर्यकांत वसंत मोटे वय 40 रा. विठठल मंदीर बागणी ता. वाळवा जि.सांगली, निखील गंगाराम सगट वय 29 रा. राजेद्रनगर कोल्हापुर ता. करवीर जि. कोल्हापुर, आसिफ अकबर देसाई’ वय 27 रा. बागणी ता. वाळवा जि.सांगली, सुरज बाबासो पोवार वय 28 रा. मिणचे ता. हातकगणले जि. कोल्हापुर, अशा आठ जणांना पकडत त्यांच्याकडून तीन मोटरसायकल , दोन चारचाकी कार आणि रोख रक्कमेसह 5 लाख 94 हजार 600 रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला .