सातारा – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक 20 तारखेला होणार असून, 23 ला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे . विधानसभेला महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे. अशातच शरद पवार गटाच्या या बड्या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टोला लगावला आहे.
अजित पवार गुलाबी जॅकेट घालतात. त्यावर अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. अजित दादांचं गुलाबी जॅकेट नाही तर गुजराती गुलामगिरीची झुल आहे, असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा हाणला आहे. सातारा येथे जनसन्मान यात्रेवेळी ते बोलत होते
काय म्हणाले अमोल कोल्हे..?
अमोल कोल्हे म्हणाले, मला पूर्ण खात्री पटली आहे उशीर झाला. असला तरी आता तुमचे घड्याळाकडे लक्ष नाही. उमेदवार तगडा आहे म्हणून चालत नाही. सर्व एकजुट झाले तर निकाल वेगळा येईल. शर्ट चप्पल विकत घेऊ शकतो पण प्रथमच महाराष्टाने नेते विकत घेतले जात आहेत. अजित दादांचं गुलाबी जॅकेट नाही तर गुजराती गुलामगिरीची झुल आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत. आता यावर अजित पवार काय म्हणातात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे .