मुंबई – सध्या राजकारणात लोकसभा निवडणुकींनंतर विधान सभा रणांगण पाहायला मिळत आहे. राजकारणात नेत्यांमध्ये घमासान सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अशातच राजकरणातील दिग्ग्ज नेत्यांमध्ये कोल्डवॉर सुरु आहे. राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधील वाद सध्या पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगितले होते. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवा यांनी मोदी सरकारवर घणाघात हल्ला केला आहे.

काय म्हणाले शरद पवार

शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे ओझं कमी केलं पाहिजे. आम्ही 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचा उल्लेख त्यांनी केला.तसेच आमचं सरकार असताना शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करुन आम्ही शेतमालाला दर दिल्याचे शरद पवार म्हणाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे नूतन खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहीत दादा पवार यांच्या उपस्थितीत शरद शेतकरी संवाद मेळाव्याच आयोजन केलं होतं. यावेळी शरद पवार बोलत होते.

अधिक उत्पन्न झाल्यानंतर शेतकऱ्यांचा शेतमाल जगाच्या बाजारपेठेत जाईल कसा याचा आम्ही विचार केल्याचे शरद पवार म्हणाले. फळबागसारखी योजना आमच्या सरकारनं आणळी होती. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे शरद पवार म्हणाले. आज मोदींचं राज्य आहे. अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे. या सत्तेचा वापर शेतकऱ्यांसाठी केला जात नसल्याचे म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. आता यावर भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे