कोल्हापूर(प्रतिनिधी) कॉंग्रेसचे जेष्ठ नेते काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीरचे आमदार, पी.एन पाटील यांचे 23 मे रोजी कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय ,सामाजिक स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. विविध मान्यवरांनी पी.एन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांची सांत्वनपर भेट घेऊन शोक व्यक्त केला.

आज स्वर्गीय पी.एन.पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राहुल पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली. सुमारे अर्धा तास शरद पवार पी.एन. पाटील यांच्या घरी थांबले होते. यावेळी शरद पवार यांनी शोक व्यक्त केला. शरद पवार यांच्या सोबत यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील,शहराध्यक्ष आर.के पोवारही उपस्थित होते. विशेष म्हणजे या भेटीवेळी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय पाटीलही शरद पवारांसोबत उपस्थित होते.

ए.वाय. पाटील ,के.पी.पाटलांनी घेतली पवारांची भेट –

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय.पाटील आणि माजी आमदार के.पी पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. दोघेही महाविकास आघाडीकडून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.पण आज त्यांनी प्रत्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने झाली होती दुखापत –

पी. एन. पाटील यांच्यावर बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर उपचार सुरू होते. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 23 मे रोजी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पी.एन पाटील हे स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खांदे समर्थक मानले जायचे. पी.एन पाटील यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.कॉंग्रेस जिल्ह्यातील एका निष्ठावान नेत्याला मुकला असल्याची भावना राजकीय स्तरातून व्यक्त होत आहे.