मुंबई (प्रतिनिधी) : शरदचंद्र पवार गट आता तुतारीने निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. याचे लॉन्चिंग किल्ले रायगडावर केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलंय. त्यामुळे शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी घेऊन रिंगणात उतरणार आहे.
आमच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळने हा सकारात्मक संकेत आहे. आणि तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसांच्या हृदयात आहे. अशी भावना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलीय. ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी ठरेल असं ही कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.