मुंबई (प्रतिनिधी) : बॉलीवूडमध्ये एका पेक्षा एक चित्रपटांमध्ये भूमिका साकरत चाहत्यांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा बॉलिवडूचा अभिनेता शाहरूख खान. शाहरूख खानकडे जगातील सर्व सुख उपभोगण्याची संधी असूनही त्याची आजपर्यंत एक राहिलेली अपूर्ण इच्छा त्याच्या मनात अजूनही घर करून राहिली आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये शाहरूख खानने त्याची इच्छा व्यक्त केलेली पहायला मिळत आहे.
शाहरूख खान काय म्हणाला..?
खान म्हणाला, शाहरूख खानच त्याच्या आईवडिलांवर खूप प्रेम होत. मात्र, शाहरूख खानचे आईवडिल त्याला लवकरच सोडून गेले. मात्र, त्याच्या आईवडिलांच्या आठवणी त्याने खूप जपून ठेवल्या आहेत. एका कार्यक्रमात शाहरूख खान आणि मेगा स्टार अमिताभ बच्चन एकत्रीत उपस्थित होते. शाहरूख खानने त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली.
शाहरूख पुढे म्हणाला, माझे आईवडील हे पेशावरचे होते. माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की जगातल्या तीन गोष्टी जरूर पाहा. मी या जगात असेल किंवा नसेन तू मात्र या तीन गोष्टी जरूर पाहा. दुर्दैवाने या तिन्ही गोष्टी ते हयात असताना होऊ शकल्या नाही. त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट एकदा इस्तानबूल नक्की पहा. यानंतर इटली म्हणजेच रोमदेखील जरूर पाहा. तिसरी गोष्ट म्हणजे काश्मीर पण पाहा. इटली किंवा इस्तानबूल माझ्याशिवाय पहा हरकत नाही. पण कश्मीर मात्र माझ्याशिवाय पाहू नको, असे मला माझे वडील म्हणाले होते. मात्र माझ्या वडिलांचे फारच लवकर निधन झाले. त्यामुळे त्यांची ही इच्छा मला पूर्ण करता आली नसल्याचे शाहरुखने अमिताभ बच्चन यांना सांगितले.
वडिलांच्या पश्च्यात काश्मीरच्या जाण्याच्या अनेक संधी मला मिळाल्या. कधी घरचे सुट्टी साजरी करण्यासाठी काश्मीरला जायचे. कधी मित्रही काश्मीरला जायचे. मात्र मी कधीही काश्मीरला गेलो नाही असं शाहरूख खान म्हणाला. कारण, माझ्या वडिलांनी माझ्याशिवाय कधी पाहू नको काश्मीर असं सांगितलं होत असंही शाहरूख खान म्हणाला आहे. या व्हिडिओमुळे चाहत्यांना शाहरूख खानची ही हळवी बाजू पहायला मिळाली आहे.