कळे (प्रतिनिधी) : कळे ता.पन्हाळा येथील कन्या विद्या मंदिर कळेची विद्यार्थीनी सिद्धी रमेश नलवडे हिची महाराष्ट्र राज्य शासन स्वच्छता मॉनिटर या प्रकल्पासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाली. तिला गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर,विस्ताराधिकारी श्रीपती चव्हाण,केंद्रप्रमुख भगवान चौगले,मुख्याध्यापक दिनकर हंकारे,किशोरी चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.