टोप (प्रतिनिधी) : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅकच्या अध्यक्षपदी हिंद गियर इंडस्ट्रीजचे राजू पाटील,उपाध्यक्षपदी सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भरत जाधव तर सुवर्णमहोत्सवी समिती अध्यक्षपदी ग्नॅट फौंन्ड्रीचे अध्यक्ष सुरेंन्द्र जैन,आयटीआयच्या अध्यक्षपदी उषा एन्टरप्राईजेसचे प्रशांत शेळके यांची,तर चौगुले इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सुरेश चौगुले यांची फौंड्री क्लस्टरच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष सुरेंद्र जैन होते. ही निवड सभा स्मॅक भवन येथे संपन्न झाली. खजानीस म्हणून शुभम टर्निंगचे बदाम पाटील यांची फेरनिवड आणि सेक्रेटरीपदी मिनर्व्हा एंटरप्राईजेसचे शेखर कुसाळे यांची निवड करण्यात आली.’स्मॅक’ही पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. शिरोली औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या ‘स्मॅक’ या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. यावेळी ‘स्मॅक’ चे संचालक नीरज झंवर, अतुल पाटील, रणजित जाधव , सुमंत पाटील, जयदीप चौगुले आदी उपस्थित होते.