मुंबई : संविधानाच्या ) 75 वर्षाच्या गौरवशाली प्रवासावर संसदेत शनिवारी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेस, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर सडकून टीका केली. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत..?
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, या देशातला निवडणूक आयोग, या देशातली संसद यांना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मोदींच्या राज्यामध्ये उद्ध्वस्त झाले आहेत. न्यायव्यवस्था दबावाखाली आहे. निवडणूक आयोग ज्याने या देशामध्ये स्वतंत्रपणे निवडणूका घ्यायच्या असतात. तो निवडणूक आयोग हा राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करतो आहे. हे संविधानाला धरुन नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी संविधानावर बोलू नये. तो संविधानाचा अपमान ठरेल.
मोदी यांनी सांगावे त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये कोणते कार्य संविधान मजबूतीसाठी केलं. ज्या पद्धतीने या देशामध्ये मग विधानसभा असेल, लोकसभा असेल विरोधी पक्षच राहू नये. विरोधी पक्षाला संविधानामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे. पण विरोधी पक्ष राहू नये. तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावावा, त्यांना तुरुंगात टाकावे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणे हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिले आहे. ईडी, सीबीआय दाखवावे कधी भाजपच्या घरी गेले आहेत. असा टोला राऊतांनी यावेळी लगावला