मुंबई – सध्या राज्यात विधानसभा रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत मोर्चेबांधणी करत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभेला कंबर कसली आहे. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधी मुख्यमंत्री पदावरून विधानसभेच्या जागेवरून कोल्ड वॉर सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीचे दोन बडे नेते ठाकरे गटाचे खासदार संजय पवार आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाद पाहायला मिळाला. श्रीगोंद्यात बोलताना संजय राऊत यांनी पुढचा आमदार ठाकरे गटाचाच राहिल असे वक्तव्य चर्चेत आले होते. त्यावर शरद पवार यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली. उमेदवाराची अशी घोषणा करणे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले. त्यावर आता शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती, संजय राऊत यांचं पवारांना पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत..?

संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. पवारांकडे श्रीगोंदाबाबत चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना काम करण्यासाठी संदेश देत असतो. 288 मतदारसंघात आपली तयारी आहे. कागलला सचिन घाडगे आहेत. अनेक मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश देतात तयारी करतात. श्रीगोंद्यात काय घडतं माहीत नाही. पण महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे. कुणीही कोणती तयारी केली नाही. पण आम्ही कार्यकर्त्यांना तयारीला लागा, कामाला लागा, पुढे व्हा असा संदेश दिला तर चुकीचं नाही. हेच संदेश पवार आणि नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला असेल तर त्यात चुकीचं नाही, असे म्हणाले.

संजय राऊत यांची श्रीगोंद्यात सभा झाली. त्यात राऊत यांनी श्रीगोद्यांतील पुढचा आमदार ठाकरे गटाचाच असेल, असे त्यांनी जाहीर केले होते. तर या मतदारसंघातून राहुल जगताप हे राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीतील तीन ही पक्ष मिळून उमेदवार ठरवतील. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी एकट्याने उमेदवार जाहीर करणे बरोबर नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. आता महाविकास आघाडीचा हा वाद आणखी वाढतो की नमता होतो हे तर येणाऱ्या काळात समझेलचं